आता ट्रेनमध्येही मिळणार डोमिनोज पिझ्झा

dominos
नवी दिल्ली : देशभर प्रवास करताना आता तुम्हाला पिझ्झा खायची इच्छा झाली, तर तुम्हाला नाराज व्हावे लागणार नाही. कारण आयआरसीटीसीने आणि डोमिनोज पिझ्झा पुरवणाऱ्या ज्युबिलिअंट फूड्स या कंपनीशी देशभर ट्रेनमध्ये पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी करार केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच देशातल्या बहुतांश स्थानकांवर डॉमिनिजोचा गरमागरम पिझ्झा तुम्हाला तुमच्या सीटवर उपलब्ध होईल. सध्या ही सुविधा काही मोजक्या स्थानकांवर उपलब्ध आहे. येत्या काही दिवसात ही सुविधा सर्व स्थानकांवर उपलब्ध होईल. ही सुविधा मिळवण्यासाठी प्रवाशांना मोबाईल अॅपचा वापर करावा लागणार आहे.

Leave a Comment