सुलभ झाले बनावट पॅनकार्ड ओळखणे

pan-card
नवी दिल्ली – आता बनावट पॅनकार्ड ओळखण्यासाठी प्राप्तीकर विभागाने नवीन तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. बनावट पॅनकार्ड रद्द करण्याचा आदेश या विभागाला देण्यात आला आहे. कर चुकवेगिरी, काळा पैसा यासारख्या अनेक अवैध प्रकरणामध्ये बनावट पॅनकार्डचा वापर करण्यात आला असल्याचे सिद्ध झाले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे बेकायदेशीर बाबी टाळण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

प्राप्तीकर विभागाने महत्त्कांक्षी इलेक्ट्रॉनिक स्मार्ट प्लॅटफॉर्म इन्कम टॅक्स बिझनेस ऍप्लिकेशन-परमनंट अकाऊंट नंबर हे विकसित केले आहे. यामुळे कर अधिकाऱयांना बनावट पॅन ओळखणे सुलभ होणार आहे. यामध्ये बनावट नंबरची चौकशी करण्यात येणार आहे. आयटी टूल यामध्ये युनिक ओळख तयार करणार आहे. त्यामुळे अर्ज करणाऱयाकडे पहिल्यापासून पॅन आहे, अथवा नाही याची माहिती उपलब्ध होणार आहे. या प्रणालीमुळे बनावटगिरीला आळा घालण्यास मोठा हातभार लागणार आहे.

नवीन ऍप्लिकेशनमध्ये बनावट पॅनची ओळख करण्यात येणार आहे. तसेच संबंधित पॅनकार्डधारकास हजर राहण्यास सांगितले जाणार आहे. यामुळे भविष्यात तो व्यक्ती बनावट पॅनकार्डचा वापर करू शकणार नाही. नवीन तंत्रज्ञानाची माहिती सर्व कार्यालयांना देण्यात आली आहे.

Leave a Comment