मंगळ ग्रहावर अवकाश यान पाठविण्याच्या तयारीत चीन

china
बिजिंग : वर्ष २०२० पर्यंत मंगळग्रहावर चीन एक अवकाश यान पाठविण्याची तयारी करत असून हे यान २०२१ पर्यंत मंगळग्रहावर पोहचण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नुकतीच ही माहिती एका अवकाश विशेषतज्ज्ञाने दिली.

चाइना अ‍ॅकेडमी ऑफ स्पेस टेक्नोलॉजी (सीएसएटी) चे शास्त्रज्ञन ये पीजियान यांनी सांगितले की चीनचे हे अवकाश यान चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या १०० व्या जन्मदिवसाच्या जवळपास मंगळावर पोहचू शकेल. मंगळावर आपले यान पाठविणारे आम्ही पहिले आशियायी राष्ट्र नाही आहोत. परंतु आम्ही याची उच्चस्तरीय सुरुवात करू इच्छित आहोत. या यानामध्ये ऑर्बिटर, ल्ँडर आणि रोवर सामील असतील. ये ने म्हटले की ऑर्बिटर मंगळचा जागतिक सर्वेक्षण करेल आणि अ‍ॅट्री डिवाइस मंगळाच्या जमिनीवर रोवर उतरवेल.

उतरताना पॅराशूट आणि रिव्हर्स थ्रस्ट इंजिन तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो आहे. मात्र आमच्याकडे प्रक्षेपणासाठी पाच वर्षापेक्षा कमी काळ आहे. तरीही आम्ही या मिशनबाबत आस्वस्त आहोत. हे यान चांग ई-३ चंद्रसयाना बनविले होते त्या पथकाने निर्मित केले आहे., सीएसएटीच्या शास्त्रज्ञाने सांगितले की हे यान गॅसबॅग, पॅराशूट आणि रिव्हर्स थ्रस्ट इंजीनला घेऊन जाईल. त्याच कारणामुळे हे यान सुरक्षितपणे मंगळाच्या जमिनीवर उतरेल.

Leave a Comment