युरी-शेफने हार्ले डेव्हीडसनला दिले नवे रुपडे

harley
बेलारूस सारख्या लहानशा देशात असलेल्या मात्र आपल्या कस्टमाईज्ड बाईक्सने जगभरात ख्यातनाम झालेल्या युरीशेफ कस्टम कंपनीने हार्ले डेव्हीडसनच्या बाईकला नवीन रूपडे बहाल केले आहे. ग्रंग नावाने कस्टमार्झज केली गेलेली ही बाईक मूळ रूपापेक्षा अधिकच साजरी गोजरी दिसते आहेच पण मूळ बाईकपेक्षा ती जादा बांधेसूदही वाटते आहे. इतकेच नव्हे तर या बाईकच्या फ्यूएल टँकचे झाकणही अतिशय देखणे केले गेले आहे.

बेलारूस हा युरोपातील छोटा देश असून तेथील युरीशेफ कंपनी जगभरात कस्टमाईज्ड बाईकसाठी विशेष नावाजली जाते. त्यांनी हर्ले डेव्हीडसनला कस्टमाईज केले असून बाईक पाहताच या गाडीचे इंजिन फक्त हर्लेचे असावे असाच फिल येतो. या बाईकला दमदार हेडलाईट दिले गेले आहेत. गाडीचा नुसता पेंट पाहूनच ती महाग आहे याचा अंदाज येतो. मात्र बाईकची किंमत जाहीर केली गेलेली नाही. युरीशेफने मोटरसायकल कस्टमाजझर म्हणून आंतरराष्ट्रीय ओळख मिळविली आहे व अगदी छोट्या काळात अनेक बक्षीसांचीही मानकरी ठरली आहे. त्यात बेस्ट इंटरनॅशनल बिल्डर अॅवॉर्डचाही समावेश आहे.

Leave a Comment