कॅनेरी आयलंडमधील अंडरवॉटर शिल्पसंग्रहालय

water2
स्पेनच्या कॅनरी लैंजरोट आयलंड वर युरोपातील पहिले अंडरवाँटर शिल्प संग्रहालय उभे करण्यात आले असून ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत आहे. हे शिल्प संग्रहालय पाण्याखाली ४० फूटांवर आहे आणि ब्रिटीश आर्टिस्ट जॅसन डकेरेज यांने ते उभारले आहे.
water1
अर्थात जॅसनचे हे पहिलेच शिल्प संग्रहालय नाही. त्याने यापूर्वी मेक्सिको आणि वेस्ट इंडिज येथेही अशा प्रकारची शिल्प संग्रहालये उभारली आहेत. स्पेनच्या शिल्प संग्रहालयात पाण्याखाली ४० फुटांवर पाण्यात फिरणारी, फोनवर बोलणारी, नावेत अडकलेली, फोटो काढणारी अशी अनेक प्रकारची शिल्पे त्याने उभी केली आहेत. यामागचा हेतू माणूस आणि निसर्ग यांचा परस्पर संबंध अधिक मजबूत व्हावा असाच आहे. जॅसन अशी संग्रहालये उभारण्यासाठी जेथे पर्यटक कमी संख्येने येत आहेत अथवा ज्या जागा वैराण आहेत अशा जागांची निवड मुद्दाम करतो. त्यामुळे त्या भागातील पर्यटनाला चालना मिळते असा त्याचा अनुभव आहे.
———

Leave a Comment