एप्रिलपासून स्वस्त होणार गृह, वाहन कर्ज !

loan
नवी दिल्ली – व्याज दरामध्ये आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी कपात केली नसली तरी एप्रिलपासून गृह, कार, टीव्ही आणि वॉशिंग मशीन या वस्तू घेण्यासाठी कर्ज सुलभपणे उपलब्ध होणार आहे. एप्रिलपासून बँकांना मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडिंगचा (निधी सीमान्त खर्च) फॉर्म्युला स्वीकारावा लागणार आहे. तसेच सरकारने पीपीएफसह लहान बचत योजनांवरील व्याज दरामध्ये मोठय़ा प्रमाणात कपात केली आहे. या दोन कारणांमुळे बँकांवर याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी दबाव निर्माण झाला आहे. बँकांना आपल्या व्याज दरातील कपातीमुळे दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment