एअरसेलचा होळीनिमित्त खास छुट्टी पॅक

aircel
मुंबई – अभिनव टेलिकॉम कंपनी म्हणून ओळख असलेल्या एअरसेलने होळीनिमित्त छुट्टी पॅक हा विशेष रोमिंग पॅक सादर केला. या पॅकमध्ये मुंबईतील ग्राहकांना ८३ रुपयांचे स्पेशल रिचार्ज केल्यावर ९० रुपयांचा टॉकटाइम तर प्रत्येक दिवसाला रोमिंगमध्ये इनकमिंग १० मिनिटे व सवलतीच्या दरात आऊटगोइंग रोमिंग सुविधा मिळणार आहे. होळीनिमित्त सुट्टीसाठी बाहेरगावी जाणा-यांना या पॅकचा फायदा होईल.

या अभिनव पॅकबद्दल अधिक माहिती देताना एअरसेलचे मार्केटिंग अधिकारी अनुपम वासुदेव म्हणाले की, रोमिंग पॅक हा खíचक असल्याने प्रवास करत असताना आमच्या ग्राहकांकडून वापर केला जात नाही. आमच्या ग्राहकांना या उत्सव काळात सुट्टीसाठी गावी जावे लागते.

या मोबाईल युगात प्रत्येकाला संपर्कात राहणे गरजेचे असते. म्हणून आम्ही ही सर्वात किफायतशीर योजना सादर केली आहे. ज्याद्वारे एखाद्याला आपल्या प्रियजनांशी आपल्या होम नेटवर्कप्रमाणे दीर्घकाळ बोलता येईल, आमची ही योजना ग्राहकांना आवडेल. छुट्टी पॅक हा खूप विचार करून तयार केला आहे. प्रत्येक परिमंडळ व ग्राहकांच्या भौगोलिक गरजेनुसार तयार केला गेला आहे. मुंबईकरता हा पॅक २८ दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. या उत्पादनामुळे एअरसेल हा देशभरात किफायतशीर आणि सर्वोत्कृष्ट रोमिंग कॉल दर व सेवा देणारा पसंतीचा ब्रँड ठरला आहे.

Leave a Comment