पाकिस्तानी बँका भारतात व्यवसायास उत्सुक

sbp
पाकिस्तानातील किमान चार ते पाच मोठ्या बँका त्यांच्या शाखा भारतात उघडण्यास उत्सुक असल्याचे पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे उपगव्हर्नर सईद अहमद यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये व्यवसाय व बँकींग सहयोगासाठी हालचाली होत नसणे ही दुर्देवाची बाब असल्याचे सांगताना पाकिस्तानी बँका भारतात व्यवसायाच्या संधी शोधाची वाट पाहात असल्याचेही नमूद केले.

मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०१२ मध्ये दोन्ही देशांनी आपापल्या दोन बँकांना परस्परांच्या देशात बॅकींग परवाना देण्याच्या मुद्दयाला सहमती दर्शविली होती मात्र त्यानंतर वातावरण बिघडल्याने पुढे हालचाल होऊ शकली नव्हती. वित्तराज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले की रिझर्व्ह बँक गर्व्हनरांनी पाक मुस्लीम कर्मशियल बँक लिमिटेड व युनायटेड बँक लिमीटेड यांनी भारतात व्यवसायासाठी अर्ज केल्याचे सांगितले होते. त्यावर अद्यापी निर्णय झालेला नाही.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या सईद अहमद यांच्या मते भारतीय बँकांनाही पाकिस्तानात व्यवसाय करण्याची उत्सुकता असणारच.फाळणीपूर्वी पंजाब नॅशनल बँकेचे मुख्यालय लाहोर येथे होते तसेच एसबीआय, बँक ऑफ इंडिया यांची १९६५ पर्यंत कराची व लाहोर येथे कार्यालये होती.

Leave a Comment