वर्षातून एकदा म्हणजे १७ मार्चला सेंट पॅट्रीक डेच्या दिवशी शिकागो नदीचे पाणी हिरवेगार दिसते आणि आठवडाभर चालणार्या या सांस्कृतिक महोत्सवात हिरवे, नारंगी कपडे घातलेले नागरिक आणि पर्यटक मोठ्या उत्साहाने सामील होतात. १९६२ पासून आजतागायत हा सोहळा शिकागोकाठी रंगतो आहे.
वर्षातून एकदा हिरवी होते शिकागो नदी
असे समजते की १९६२ साली प्रथम प्लंबर असो.ने नदीच्या पाण्याच्या प्रदूषण तपासणीसाठी त्यात फ्लोरससीन हे रसायन घातले. त्यामुळे नदी हिरवीगार झाली मात्र पर्यावरण विभागाने नदीचे यामुळे नुकसान होत असल्याचे बजावल्यावर त्यानंतर या रसायनात भाज्यांची पूड मिसळली जाऊ लागली. यामुळे पाण्याचे नुकसान झाले नाही. तेव्हापासून नदीचा वर्षातून एकदा दिसणारा हिरवा रंग ही सेंट पेट्रीक डे सोहळ्याची ओळख बनला आहे. पेट्रीक हे आयर्लंडमधील संत असून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कॅथॉलिक समाज १७ व्या शतकापासून अनेक देशात १७ मार्च हा दिवस सेंट पेट्रीक डे म्हणून साजरा करतो.