जगातील सर्वाधिक लांबीचे एअरलँडर १० येणार

airlander
युकेमध्ये टेस्ट फ्लाईटसाठी तयार असलेल्या ब्रिटीश फर्म हायब्रिड एअर व्हेईकल्सने बनविलेले जगतील सर्वाधिक लांबीचे व २०हजार किलो वजन असलेले विमान एअरलँडरचे नवे फोटो रिलीज केले गेले आहेत. हे विमान ३०२ फूट लांब असून ते सर्वात लांब पॅसेंजर जेटपेक्षाही ६० फूट अधिक लांब आहे.

धड ना हेलिकॉप्टर, धड ना स्पेसशीप व धड ना विमान असे हे आगळेवेगळे विमान रिमोटवर चालते आणि हवेत ३ आठवडे राहू शकते. गोळ्यांच्या भडीमारातही हे विमान निर्धोक प्रवास करू शकते. ते प्रतितास १४८ किमी वेगाने उडू शकते. या विमानाचे आज अनावरण केले जात असून त्याची टेस्ट फ्लाईट येत्या कांही आठवड्यात घेतली जाणार आहे. या विमानासाठी १८७ कोटी रूपये खर्च आला आहे.

प्रथम अमेरिकेन लष्कराने असे विमान नजर ठेवण्याच्या कामासाठी घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र पुरेशी आर्थिक तरतूद होऊ न शकल्याने हा बेत बारगळला होता त्यामुळे कंपनीने त्यांचे हक्क परत घेतले होते. हे विमान हेलिकॉप्टर प्रमाणे सरळ वर उडू शकते तसेच जमीन, पाणी, बर्फ, वाळवंटात सहज उतरू शकते. २०१८ पर्यंत अशी १२ विमाने तयार केली जाणार असून त्यात प्रवासी विमानाचाही समावेश असेल. या विमानातून एकावेळी ४८ प्रवासी प्रवास करू शकतील असे समजते.