अवघ्या तीन हजारात गोबर गॅस

bio-gas
आपल्या घराला गच्ची असेल तर ती आता वाया जाणार नाही. तिला आपण ऊर्जा निर्मिती करणारे पॉवर हाऊस बनवू शकतो. आजवर लोकांना याच गच्चीवर सोलर पॅनेल बसवता येतात हे माहीत झाले आहे पण आता याच जागेत आपण गोबर गॅस संयंत्रही बसवू शकतो याची आपल्याला माहिती नाही. पण ते शक्य आहे. गोबर गॅस हा केवळ शेतकर्‍यांनाच शक्य आहे असे काही नाही. कोणालाही तयार करता येईल आणि वापरताही येईल. त्यासाठी त्यांना केवळ एक़ टोपले भरून शेण लागेल.

कर्नाटकाच्या चिकमगळूर जिल्ह्यातल्या मुडगिरी तालुक्यातल्या दरदहळ्ळी या गावातल्या कृष्णमराजू यांनी असा एक गोबर गॅस तयार केला आहे की ज्याच्या उभारणीला फार जागाही लागत नाही आणि केवळ 3 हजार रुपये एवढाच खर्च येतो. त्यासाठी 12 बाय 7 फूट आकाराचे एक इंच जाडीचे प्लॅस्टरचे शीट लागेल. त्याला दोन पाईप जोडलेले आहेत. सकाळी या प्लँट मध्ये टोपलेभर शेण टाकलें आणि काही पाणी सोडले की त्याच्या पायपातून वायू निघायला लागतो. दिवसाला चार ते पाच तास गॅस मिळतो. या संयंत्राबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी कृष्णमराजू यांच्याशी 94480 73711 या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.