वारंवार मोबाईल पाहणे आरोग्यासाठी घातक!

smartphone
वॉशिंग्टन – मोबाईल फोन दैनंदिन गरज बनली असली, त्याच्याकडे सातत्याने पाहणे आरोग्यासाठी घातक असल्याचा निष्कर्ष एका ताज्या अभ्यासातून काढण्यात आला.

या अभ्यासानुसार, स्मार्टफोन वारंवार पाहण्याची सवय ही संतुष्ट प्रक्रियेला प्रभावित करते. अमेरिकेच्या टेम्पल विद्यापीठातील मनोवैज्ञानिक हेन्री विल्मर आणि जेसन यांनी या संशोधनाच्या माध्यमातून स्मार्टफोनचे होणार दुष्परिणाम समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या अभ्यासासाठी ९१ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना प्रश्‍नावली देण्यात आली होती. तसेच इतर परीक्षणाद्वारेही त्यांची याबाबतची माहिती जाणून घेतली. सोप्या पद्धतीने वापरले जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अधिकाधिक वापर दुष्परिणाम करतो. तसेच तत्काळ निकाल हवा, अशी भावना वाढीस लागते. विल्मर यांच्या मते, वारंवार स्मार्टफोन बघण्याची सवय घातक ठरू शकते. त्यामुळे संतुष्ट होण्याची भावना प्रभावित होऊ शकते.

Leave a Comment