आता विमा क्षेत्रात देखील ४९ टक्के एफडीआय

fdi
नवी दिल्ली : अन्य देशांतून विमा क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी अर्थात विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने विमा क्षेत्रातील नियम आणखी शिथिल करीत ४९ टक्के एफडीआयला मंजुरी दिली आहे. गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्यात आल्याने आता विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढणार आहे.

सध्या विमा क्षेत्रात २६ टक्क्यांपर्यंतच विदेशी गुंतवणुकीला मुभा आहे. मात्र, आता केंद्र सरकारने ४९ टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्याने या क्षेत्रात विदेशातील गुंतवणूकदार आणखी गुंतवणूक वाढवू शकतात. गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्यासाठी विदेशी गुंतवणूक संवर्धन बोर्डाची परवानगी घ्यावी लागते. याबाबत सरकारने अधिसूचनाही काढली आहे. देशात सध्या ५२ विमा कंपन्या आहेत. त्यातील २४ कंपन्या जीवन विमा कंपन्या आहेत, तर २८ सर्वसाधारण विमा कंपन्या आहेत. देशात चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरदरम्यान एफडीआयमध्ये ४० टक्के वाढ झाली असून, २९.४४ अब्ज डॉलर्स झाला आहे.

Leave a Comment