मोबाईल चॅटिंग, ट्विटरही ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत

global-warming
पॅरिस : मोबाइल चॅटिंग, ई-मेल आणि ट्विटरही ग्लोबर वॉर्मिंगला कारणीभूत आहे, असे कुणी म्हटले तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. सध्याच्या डिजिटल जमान्याचा वातावरणावर भयंकर परिणाम होत असून सतत वापरल्या जाणा-या टेक्नॉलॉजीमुळे अत्यंत घातक अशा कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. मोबाइल फोन, लॅपटॉपचा वापर कमीत कमी करावा, यासाठीही लोकांना प्रोत्साहित केले जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

अलिकडे मोबाईलचा वापर वाढला आहे. अँड्राईड मोबाईलमुळे तर बहुतांशी मंडळी आणि विशेषतः युवा वर्ग त्यातच गुंतून जात आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर, चॅटिंग घातक ठरण्याची चिन्हे आहेत. लॅपटॉप, स्मार्टफोन, कॉम्प्यूटरसारख्या विद्युत उपकरणांच्या वापरासाठी प्रचंड प्रमाणात वीज वापरली जाते. शिवाय ही उपकरणे बनतानाही प्रचंड कार्बन डायऑॅक्साइड उत्सर्जित होतो. यालाच कार्बन फूटप्रिंट म्हणतात. एका ई-मेलमुळे ४ ग्रॅम कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडला जातो.

त्याचा हिशेब केल्यास ई-मेल वापरणारी प्रत्येक व्यक्ती दरवर्षी ४० दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडते. एका दिवसात ४ ते ५ ई-मेल्स पाठवणे म्हणजे एक किलोमीटर कार चालवल्यासारखेच आहे.

Leave a Comment