संशोधकांनी लावला ९ महाकाय ता-यांचा शोध

nasa
न्यूयॉर्क – ९ महाकाय ता-यांचा शोध नासाच्या हबल अंतराळ दुर्बीणीद्वारे संशोधकांनी घेतला आहे, जे सूर्याच्या तुलनेत १०० पटीने अधिक मोठे आहेत. खगोलशास्त्रज्ञांनी इनको आर१३६ तारा समूहातून शोधला आहे. हा तारा समूह आकाशगंगेत लार्ज मॅगेलेनिक क्लाउडच्या अंतर्गत तरनतुला नेबुलामध्ये १७०००० प्रकाशवर्षे दूर स्थित आहे.

ही पहिली वेळ आहे जेव्हा एवढय़ा मोठय़ा संख्येत महाकाय ताऱयांना शोधण्यात आल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. आर१३६ तारा समूहात यांच्याशिवाय आणखी अनेक तप्त आणि अत्यंत चमकणारे तारे आहेत, जे सातत्याने ऊर्जा उत्सर्जित करतात. सूर्यापेक्षा आकार आणि द्रव्यमानात अनेक पट मोठे असण्याबरोबरच शोधण्यात आलेले ९ तारे खूपच चमकणारे आहेत. यात सूर्यापेक्षा अनेक लाख पट अधिक चमक आहे. सर्व ९ तारे प्रत्येक महिन्याला पृथ्वीच्या आकाराएवढे पदार्थ प्रकाशाच्या वेगाच्या एक टक्के वेगाने बाहेर फेकतात असेही संशोधकांनी म्हटले.

Leave a Comment