‘मेजू’ चा आरोप; ‘अ‍ॅपल’ ने चोरले आमचे डिझाईन

aplle
अ‍ॅपलवर चीनी स्मार्टफोन कंपनी मेजूने आरोप केला आहे की, मेजूचा येणारा नवा स्मार्टफोन प्रो६शी अ‍ॅपलने आयफोन ७चे डिझाईन फारच मिळतेजुळते आहे. एका वेबसाइटनुसार, मेजूचे उपाध्यक्ष ली नेनने दावा केला आहे की, अ‍ॅपल आयफोन ७चे डिझाइन मेजूच्या नव्या स्मार्टफोनप्रमाणे आहे. आयफोनच्या आगामी हँण्डसेटमध्ये ३जीबी रॅम, ५.५ इंच डिस्प्ले असू शकतो.

आयफोनने या स्मार्टफोनचे डिझाइन आणि लूक चोरल्याचा आरोप नेन यांनी केला आहे. आता कंपनीने दावा केला आहे. आयफोन७ हा मेजू प्रो ६ प्रमाणे दिसणारा असेल. आयफोन ७ प्रो हा या मार्च महिन्यात नव्हे तर सप्टेंबर महिन्यात लाँच होणार आहे. कंपनी २१ मार्चला ४ इंच बजेट आयफोन लाँच करणार आहे.

नुकतेच वीबोवर मेजू प्रो ६चे काही फोटो पोस्ट करण्यात आले होते. ज्यामध्ये फोनचे डिझाइन दाखविण्यात आले होते. कंपनीचे उपाध्यक्ष ली नेनच्या मते, ‘फॅक्टरीतील एका स्टाफच्या चुकीमुळे या स्मार्टफोनची इमेज लीक झाली. आम्ही या स्मार्टफोनच्या लूकबाबत मागील अनेक दिवसांपासून काम करीत आहोत आणि हा स्मार्टफोन आयफोन ७ पेक्षाही भारी असले.

Leave a Comment