बिजिंगच्या पोल्यूटेड हवेत झुकेरबर्गचे जॉगिंग

zukerbrg
चीनची राजधानी बिजिंगच्या थेनआन मेन चौकात प्रदूषणाची पातळी उच्च असताना कोणत्याही प्रकारचा फिल्टर मास्क न वापरता जॉंगिंग करत असलेल्या मार्क झुकेरबर्गच्या व्हायरल झालेल्या फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फेसबुकच्या या सहसंस्थापकावर त्याच्या या कृतीने अनेक तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या असल्याचेही समजते.

मार्क सध्या आर्थिक परिषदेत भाग घेण्यासाठी बिजिंगला गेला आहे. चीनमध्ये फेसबुकवर बंदी आहे. त्यातच मार्कने अन्य पाचजणांसह बिजिंगच्या या ऐतिहासिक चौकात जॉगिंग करत असल्याचे फोटो सोशल साईटवर टाकले आहेत. यावेळी हवेतील प्रदूषणाची पातळी नेहमीपेक्षा अधिक होती व अशा हवेत श्वास घेणे म्हणजे आजाराला निमंत्रण मानले जाते. त्यामुळे अशा वेळी त्याने निदान फिल्टर मास्क तरी घालायला हवा होता असेही अनेकांनी त्याला सुनावले आहे. कांही जणांच्या मते मात्र मार्कची ही कृती म्हणजे चीनच्या नेतृत्त्वाला खूष करण्याचा एक प्रयत्न आहे. यामुळे तरी चीनमध्ये फेसबुकवर असलेली बंदी उठते का ते पाहायचे.

Leave a Comment