फ्लिपकार्टकडून खराब उत्पादने विकणा-यांवर कारवाई

flipkart
नवी दिल्ली – आपल्या प्लॅटफॉर्मवर असणा-या २५० विक्रेत्यांना ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने काळ्या यादीत टाकले आहे. फ्लिपकार्टच्या माध्यमातून खराब उत्पादने विकताना विक्रेते आढळून आले होते.

फ्लिपकार्टचे ३०० पेक्षा जास्त कर्मचारी आणि एक मोठी कंसल्टन्सी फर्मचे कर्मचारी फ्लिपकार्ट डॉट कॉमवर खरेदी करत होते. हे विक्रेते चांगल्या उत्पादनाऐवजी खराब उत्पादने ग्राहकांना विकताना आढळून आले होते. आम्हाला ६०० पेक्षा जास्त विक्रेत्यांबाबत तक्रारी मिळाल्या असून, आम्ही त्यातील ५०० विक्रेत्यांवर तक्रारी दाखल केली आहे. त्यातील ४०-५० टक्के जणांना काळ्य़ा यादीत टाकले आहे, अशी माहिती फ्लिपकार्टकडून देण्यात आली आहे. हे सर्व विक्रेते खराब उत्पादने ग्राहकांना विकत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Comment