एअरबस भारतात सुरू करणार प्रशिक्षण केंद्र

airus
भारताच्या अॅव्हीएशन बाजारात पकड मजबूत करण्यासाठी युरोपमधील सर्वात मोठी एअरक्राफट कंपनी एअरबस सज्ज झाली आहे. केंद्र सरकारच्या कुशल भारत योजनेअंतर्गत कंपनीने भारतात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ४ कोटी डॉलर्स म्हणजे २६६ कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

कंपनीचे भारतातील अध्यक्ष श्रीनवासन द्वारकानाथ या संदर्भात माहिती देताना म्हणाले, हे प्रशिक्षण केंद्र २०१७ मध्ये सुरू होईल व २०१८ नंतरच्या दहा वर्षात येथे ८ हजार पायलट व २ हजार मेंटेनन्स इंजिनिअर्सना प्रशिक्षित केले जाईल. हे केंद्र दिल्ली एनसीआर येथे सुरू केले जात आहे. एव्हीएशनमध्ये येत्या दोन वर्षात भारतीय बाजारात दुप्पट वाढ अपेक्षित आहे व त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायलटस व मेटेनन्स इंजिनिअर लागणार आहेत. हे प्रशिक्षण केंद्र एअरबस स्वतःच चालविणार आहे व त्यासाठी एकावेळी ४ ए३२० विमाने मावतील असे डिझाईन केले जात आहे.

Leave a Comment