एसबीआय मोबाईल बँकिंगमध्ये आघाडीवर

sbi
नवी दिल्ली – मोबाईल बँकिंग ऍप या विभागामध्ये खासगी क्षेत्रातील बँकांच्याही पुढे स्टेट बँक ऑफ इंडिया गेली आहे. एसबीआय डिसेंबरमध्ये ट्रेंडिएस्ट मोबाईल बँकिंग स्पेसमध्ये प्रथम कमाकांवर जाण्यात यशस्वी ठरला आहे. यामुळे किरकोळ कर्जाबाबत अंदाज बांधण्यात आला आहे.

याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मोबाईल बँकिंगमध्ये एसबीआय देशात सर्वात आघाडीवर असून, त्यांचा बाजारातील हिस्सा ३५ टक्के आहे. कर पेमेंट आणि रक्कम हस्तांतरण या सुविधांमुळे मोबाईल बँकिंगमध्ये एसबीआयचा हिस्सा वाढला आहे. या विभागामध्ये एसबीआयने खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांना पिछाडीवर टाकले आहे.

एसबीआय उद्योजकांना वापरासाठी सुलभ सुविधा देण्यात आल्याने मोबाईल बँकिंगमध्ये सर्वात पुढे आहे. अनेक लहान उद्योजक डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याअगोदर मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून आपले व्यवहार करत आहेत. एकदा त्यांनी मोबाईल बँकिंगचा वापर सुरू केल्यानंतर त्यांना याच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध होत असल्याने ते याच्याशी जोडून राहिलेले दिसून येत आहेत.

Leave a Comment