व्हॉट्सअॅप मेसेज बनवा आणखी आकर्षक

whatsapp
मुंबई : आता आणखी काही नवे फीचर्स व्हॉट्सअॅप या इंस्टंट मेसेजिंग अॅपच्या अँड्राईड व्हर्जनमध्ये अॅड करण्यात आले असून त्यानुसार तुम्ही पोस्ट करत असलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजमधील मजकूर बोल्ड आणि इटॅलिक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. गूगल प्ले स्टोरमध्ये व्हॉट्सअॅपचे नवे व्हर्जन २.१२.५३५ उपलब्ध आहे.

या नव्या व्हर्जनमुळे आपल्याला मेसेजमधील जो भाग महत्वाचा असेल त्याला आपल्या सोईप्रमाणे बोल्ड किंवा इटॅलिक करता येणार आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर फक्त एकाच फॉन्ट आणि फॉन्टसाईजमध्ये पाठवण्याची सुविधा होती. काही दिवसांपूर्वी लिंक हायलाईटची सुविधा व्हॉट्सअॅपने दिली होती. लिंक पॉपअप हायलाईटनंतर पीडीएफ किंवा वर्ड्स यासारखे डॉक्युमेंट्स शेअर करण्याची सुविधाही अलीकडेच व्हॉट्सअॅप धारकांना मिळाली होती.

डॉक्युमेंट्स शेअर करताना त्यामध्ये आणखी एक पर्याय देण्यात आला आहे. तो म्हणजे आता तुम्ही गूगल ड्राईव्हमध्ये सेव्ह असलेले डॉक्युमेंटही शेअर करु शकता. यापूर्वी फक्त आपल्या स्मार्टफोन मेमरीमध्ये सेव्ह असलेले डॉक्युमेंट्स शेअर करता येत होती. आता व्हॉट्सअप यूजर्स आपल्या गूगल ड्राईव्हमध्ये असलेली पीडीएफ, वर्ड किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनही शेअर करु शकतील. गूगल ड्राईव्हमधून या डॉक्युमेंट्स फाईल तुम्ही व्हॉट्सअॅपवर शेअर करतानाच त्या आपोआप पीडीएफमध्ये कन्व्हर्ट होतील.

Leave a Comment