फेडरल बँकेचे व्याज दर ‘जैसे थे’

fedral-bank
नवी दिल्ली : संपलेल्या दोन दिवसीय बैठकीनंतर अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र येत्या चालू वर्षामध्ये व्याज दरामध्ये वाढ करण्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱयांनी दिले आहेत. व्याज दरात वाढ न करण्यात न आल्याने युरोपीय आणि आशियायी बाजारांवर त्याचा परिणाम दिसून आला आहे.

अमेरिकेमध्ये सध्या नोकऱयांमध्ये वाढ होत असून, अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे व्याज दरात वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बाजारातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, फेड चालू वर्षामध्ये दोन वेळा व्याज दरामध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.

फेडरल रिझर्व्ह बँकेकडून जागतिक बाजारामध्ये असलेल्या दबावाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक बाजारातून मागणी कमी झाली असून, याचा मोठा परिणाम भविष्यात पहायला मिळू शकतो. चालू वर्षामध्ये अर्थव्यवस्थेवर दबाव कायम राहण्याची शक्यता असल्याचे फेडरल रिझर्व्हकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment