नाईकीचा (Nike) पहिलावहिला हायफंडू शूज लाँच

nike
मुंबई: नाइकी (Nike) स्पोर्ट्स विअरच्या ब्राण्डने आपोआप लेस बांधल्या जाणा-या बूटाची पहिली झलक दाखवली आहे.

नाईकीने आपल्या नव्या सेल्फ-लेशिंग बुटाचे लाँचिंग केले आहे. हायपर अॅडप्ट असे याचे नाव आहे. जो १.० सेल्फ लेशिंग मशीनने लेस असेल. हायपर अॅडप्ट १.०च्या या शूजची खासियत म्हणजे जेव्हा तुम्ही या शूजमध्ये पाय टाकणार त्यावेळेस या शूजच्या लेस आपोआप बांधल्या जाणार आहेत. ही नवी टेक्नोलॉजी नाइकीने लाँच केली असून हे शूज दिसायलाही फारच आकर्षक आहेत. या नव्या शूजचे न्यूयॉर्कमध्ये कंपनीच्या सीईओच्या हस्ते लाँचिंग केले. पुढील महिन्यापासून या शूजची विक्री सुरु होईल अशी आशा करण्यात येते आहे. मात्र, नाइकीने आतापर्यंत या बुटांची किंमत जाहीर केलेली नाही.