४८ हजारांना १५ हजाराच्या ‘गॅलेक्सी एस७’ची विक्री!

samsung
मुंबई : गॅलेक्सी एस७ आणि गॅलेक्सी एस७ एज हे दोन स्मार्टफोन सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच भारतात लॉन्च केले. या दोन्ही स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे ४८ हजार ९०० रुपये आणि ५६ हजार ९०० रुपये एवढी आहे. पण काही तज्ञांच्या मते या डिव्हाईसची किंमत फक्त १५ हजार रुपये असून हे स्मार्टफोन एवढ्या मोठ्या किंमतीत का विकले जात आहेत?

स्मार्टफोन तज्ञांच्या माहितीनुसार, सॅमसंगच्या या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची खरी किंमत १५ हजार ७५० रुपये आहे, मात्र बाजारात हे स्मार्टफोन ५० हजारांच्या घरात आहेत. तज्ञांनी याची काही कारने सांगितली आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सची आर. अँड डी. मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन, सॉफ्टवेअर फीचर्स आणि इतर टॅक्समुळे किंमत वाढली आहे.

गॅलेक्सी एस७ चा डिस्प्ले ५.१ इंचाचा सुपर एमोल्डक्वाड एचडी, तर पिक्सेल डेन्सिटी ५७७ppi आहे. गॅलेक्सी एस७ एज स्मार्टफोनचा डिस्प्ले ५.५ इंचाचा असून सुपर एमोल्ड आहे. गॅलेक्सी एस७ची स्टोरेज क्षमता ३२ जीबी आणि रॅम ४जीबी आहे. स्क्रीनच्या बाबतीत हे दोन्ही स्मार्टफोन उत्कृष्ट आहेत.

Leave a Comment