भारताची हेरगिरी करणारी अॅप ‘गुगल’ने हटवली !

google
नवी दिल्ली – पाकिस्तानमधील गुप्तचर विभाग, आयएसआय भारतीय लष्कराबद्दलची माहिती मिळविण्यासाठी वापरत असलेली “स्मेश अॅप‘ गुगलने प्ले स्टोअरवरून काढून टाकली आहे.

भारतीय लष्करावर पाकिस्तानमधून पाळत ठेवून महत्वाची माहिती हॅक करण्यासाठी या अॅपचा उपयोग करण्यात येत होता. या अॅपची मदत पठाणकोटवरील हल्ल्यासाठीही घेण्यात आली होती. हल्ल्यादरम्यान भारतीय लष्कराची कारवाईबाबतची माहिती या अॅपद्वारे दहशतवाद्यांपर्यंत पोचत होती. पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने फेसबुकवर काही बनावट खाती तयार करून भारतीय लष्करातील जवानांकडून शक्‍य तेवढी माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारच्या १० बनावट प्रोफाईल्सला अद्यापपर्यंत लष्करातील १० जवान अनावधनाने जोडले गेल्याचेही समोर आले आहे. दरम्यान या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत गुगलने स्मेश अॅप गुगल अॅप स्टोअरवरून काढून टाकले आहे.

Leave a Comment