
चेन्नई : बंगळुरू येथील सॉफ्टवेअर तांत्रिक तज्ज्ञ रोशी जॉन यांनी मित्रांच्या मदतीने ‘टाटा नॅनो ऑटोनॉमस’ ही देशातील पहिली चालकरहित कार विकसित करीत एका स्वप्नाची पूर्तता केली आहे. टीसीएसमध्ये रोबोटिक यंत्रणेचे जॉन हे प्रमुख असून त्यांनी आपल्या २९ सदस्यांच्या चमूसह ही कार तयार केली आहे. ३ डी मॉडेल असलेल्या या कारची अद्याप रस्त्यावर पूर्ण चाचणी व्हायची आहे. त्यासाठी त्यांना वाहतूक पोलिसांची परवानगी हवी आहे.
भारताची पहिली चालकरहित कार बंगळुरूत बनली
कशी साकारली ही कार
जॉन यांनी २०११मध्ये टाटा नॅनो कार खरेदी केली. ड्रायव्हरविना चालणाऱ्या कारचा विकास करण्यासाठी जगभरात निस्सान, जनरल मोटर्स, बीएमडब्ल्यू, गुगल आणि टेल्सा यासारख्या कार कंपन्यांनी गुंतवणूक चालविली असताना जॉन यांनी नॅनोची निवड केली. गुगलच्या स्वयंचलित कारने कॅलिफोर्नियात एका सार्वजनिक बसला धडक दिल्याची बातमी अलीकडेच चर्चेचा विषय ठरली असताना जॉन यांच्या कारची चर्चा जोर धरू शकते.
