फेसबुक जगभरात पोहोचविणार इंटरनेट

Artificial-Intelligents
न्यूयॉर्क: ‘आर्टिफ़िशिअल इंटेलिजन्स’चा वापर करून जगाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेटचे जाळे पोहोचविण्यास फेसबुक सज्ज झाले आहे. यामुळे अत्यंत किफायतशीर दरात इंटरनेट उपलब्ध होऊ शकणार आहे.

फेसबुकच्या पथकाने भारतासह २० देशांच्या २ कोटी १६ लाख वर्ग किलोमीटर १४.६ अरब छायाचित्र जमा करून त्याच्या सहाय्याने संपूर्ण जगाच्या मानवी वस्तीचा नकाशा तयार केला आहे.

सौर उर्जेवर चालणाऱ्या विमानांद्वारे इंटरनेट जमिनीवर पोहोचविण्यात येणार आहे; अशी माहिती फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी दिली. या योजनेद्वारे अल्जिरिया, बुर्कीना फासो, कॅमेरॉन, मिस्र, इथियोपिया, घाना, भारत, आयवरी कोस्ट, केनिया, मादागास्कर, मॅक्सिको, मोझाम्बिक, नायजेरिया, दक्षिण आफ्रीका, श्रीलंका, टांझानिया, तुर्की, यूगांडा, यूक्रेन आणि उजबेगिस्तान या देशांचा समावेश आहे.

Leave a Comment