आता उलगडले ३००वर्षे जुने गणितीय रहस्य

maths
लंडन – ३००वर्षे जुने गणितीय रहस्य ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका प्राध्यापकाने उलगडले असून यासाठी या प्राध्यापकाला ५,००,००० पौंड मिळाले. अकॅडमिक्ससाठी ही कामगिरी अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात आली आहे. ६२ वर्षीय ऍन्ड्रय़ू विल्स यांना नॉर्वेच्या अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्सकडून एबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हे यश प्रिन्सटनमध्ये काम करत असताना कॅम्ब्रिजमध्ये जन्मलेले सर ऍन्ड्रय़ू यांनी मिळविले. सर्वात आधी १६३७ मध्ये प्रेंच गणितज्ञ पियरे डी फर्मेट यांच्याद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रमेयात गणिताचे उत्तर नसल्याचे सांगण्यात आले होते. अकॅडमीनुसार विल्स यांचे उत्तर केवळ त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू होता असे नाहीतर गणितासाठी देखील एक महत्त्वपूर्ण क्षण होता. एबेल पुरस्कार २००२मध्ये सुरू करण्यात आला होता आणि हा नॉर्वे गणितज्ञ नील्स हेन्रिक एबेल यांच्या नावावर दिला जातो, ज्यांचा मृत्यू १८२९ मध्ये झाला होता.

Leave a Comment