सौंदर्याचे नवे परिणाम ए फोर साईज पेपर

weist
वरील हेडिंग वाचून कदाचित कोणताच अर्थबोध होणार नाही. मात्र महिलांच्या सौंदर्यासाठी जी परिमाणे जगमान्य आहेत त्यात या नव्या फंड्याचा समावेश केला गेला आहे. आजपर्यंत ३६-२४-३६ हे मदनिकांचे सौष्ठव मानले जात होते त्यात आता ए फोर वेस्ट चॅलेंजची भर पडली आहे. सध्या सोशल मिडीयावर या एफोर वेस्ट चॅलेंजने नुसता धुमाकुळ घातला आहे. सर्वसाधारण पणे मृगनयन,सिंहकटी, चाफेकळी नाक, मोत्यासारखे दात आणि चवळीच्या शेंगेसारखा बांधा ही आजपर्यंत सौंदर्याची परिमाणे होती.

कांही काळापूर्वी झिरो फिगरचे फॅड होते त्याऐवजी आता हे नवे खुळ आले आहे. या अजब ट्रेंड नुसार महिलेची कंबर ए फोर साईजच्या पेपरने मोजली जाते. म्हणजे या साईजच्या कागदाच्या रूंदीइतकी कमर असेल तर सुंदर पण त्याहीपेक्षा कमी साईजची कंबर असेल तर ती अतिसुंदर. या नव्या फॅडमुळे तरूणी आणि महिला इतक्या वेड्या झाल्या आहेत की या साईजच्या पेपरमध्ये आपली कंबर कशी फिट बसते हे दाखविणारे फोटो त्या धडाधड इंस्टाग्रामवर टाकत आहेत. त्यातही चीनी महिला आघाडीवर आहेत. त्यानी हे चॅलेंज अधिक गंभीरपणे घेतल्याचे दिसत आहे कारण या फोटोत चिनी महिलांचा भरणाच अधिक आहे.