अवघ्या १२ दिवसांच्या चिमुकल्याला मिळाले आधारकार्ड

aadhar-card
सिरसा – आधारकार्ड नोंदणी पथकाने हरियाणातील सिरसामध्ये एका १२ दिवसाच्या चिमुकल्याचे फोटोसहीत आधारकार्ड तयार केले आहे. विशेष म्हणजे अद्याप या मुलाचे बारसेही झाले नसल्याने त्याच्या नावाच्या ठिकाणी त्याच्या आईचा नामोल्लेख करत बेबी फर्स्ट ऑफ मीनाक्षी देवी असे नमूद केले आहे.

२६ फेब्रुवारीला एका खासगी रुग्णालयात सुधीर कुमार यांच्या पत्नी मीनाक्षी देवी यांनी या बालकाला जन्म दिला. त्यानंतर रुग्णालयातर्फेच आधार नोंदणीसाठी बालकाची सर्व माहिती घेतली. तीन तासातच नोंदणी पथक तेथे आले आणि त्यानंतर फक्त १२ दिवसांमध्येच बालकाचे आधारकार्ड तयार झाल्याचा फोन आल्याने सर्व कुटुंबीयांना सुखद धक्का बसला.