हा आहे जगातला पहिला रॉयल घोडा

horse
लंडन: अनेक वेगवेगळ्या डिझायनर कपड्यांमधील कुत्रे आणि मांजरी आपण पाहिल्या आहेत. पण तुम्ही कधी अशा डिझायनर कपड्यांमध्ये एका घोड्याला बघितले आहे? नाही ना? पण आता एका घोड्यासाठी स्पेशल डिझायनर सूट तयार करण्यात आला आहे. हा जगातला पहिला असा घॊडा आहे ज्यासाठी असा सूट तयार करण्यात आला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा घोडा या सूटमध्ये आणखीनच जास्त रूबाबदार आणि आकर्षक दिसतो आहे.

यावर्षी होत असलेल्या चेल्टेनमेंट फेस्टीव्हलच्याआधी लोकप्रिय रेसींग घोड्यासाठी थ्री-पीस सूट तयार करून घेण्यात आला आहे. यात शर्ट, टाय आणि एक फ्लॅट कॅपही तयार करण्यात आली आहे. एम्मा सॅन्डहम-किंग या प्रसिद्ध डिझायनरने हा या घोड्यासाठीचा थ्रीपीस तयार केला आहे.

चार आठवड्यात या घोड्यासाठी हा सूट तयार करण्यात आला आहे. आता तुम्ही विचार करू शकता की, इतक्या मोठ्या प्राण्यासाठी एक डिझायरनर सूट तयार करणे किती अडचणीचे काम असेल. पण ते अनेक अडचणींना दूर करून पूर्ण करण्यात आले आहे.

हा सूट तयार करण्याच्या अनुभवाबद्दल डिझायनरने सांगितले की, घोड्यासाठी तयार करण्यात आलेला हा स्पेशल सूट तयार करणे हे माझ्यासाठी आतापर्यंत मी केलेल्या कामांपेक्षा सर्वात मोठे चॅलेन्ज होते. यासाठी आम्ही १८ मीटर कपडा वापरला असून एक शानदार डिझायनर सूट तयार केला आहे.

काहीही असो हा घोडा खरंच नशीबवान आहे की त्याच्यासाठी एक डिझायनर सूट करण्यात आला आहे. हा जगातला पहिला असा घॊडा आहे ज्यासाठी असा सूट तयार करण्यात आला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा घोडा या सूटमध्ये आणखीनच जास्त रूबाबदार आणि आकर्षक दिसतो आहे.

Leave a Comment