सेल्फीच्या सहाय्याने करा पेमेंट

amezon
ऑनलाईन पेमेंट करण्यातील सुरक्षितता वाढविण्यासाठी ई कॉमर्स कंपनी अमेझॉनने नवा प्रयोग सुरू केला आहे. त्यानुसार ऑनलाईन शॉपिंग पेमेंट करताना ग्राहक सेल्फीसह पेमेंट करू शकणार आहे. यामुळे ग्राहकाला पासवर्ड वापरण्याची गरज राहणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार नव्या सुविधेनुसार खरेदीचे पेमेंट करताना ग्राहकाला दोन फोटो पाठवावे लागतील. पैकी एक सेल्फी असेल तर दुसर्‍यात डोळ्यांची उघडझाप करावी लागेल. यामुळे फोटो खरा आहे याचा पुरावा मिळेल. गर्दीच्या ठिकाणांहून पेमेंट करण्याची वेळ आल्यास ही सुविधा अत्यंत सुरक्षित राहणार आहे कारण ग्राहकाला पासवर्डचा वापर करावा लागणार नाही. अॅमेझॉनने या तंत्रज्ञानाचे पेटंट अगोदरच मिळविेले असल्याचे अमेरिकन पेटंट विभागाने जाहीर केले आहे.

Leave a Comment