फूट मसाजने मिळवा अंगमर्दनाचे फायदे

foot
शरीराला नियमित मसाज करणे हे फार महत्त्वाचे मानले जाते. सर्व अवयवांचे कार्य सुरळीत चालावे आणि म्हातारपण दूर रहावे यासाठी अंगमर्दन करण्याची प्राचीन भारतीय परंपरा आहे. मात्र आजकालच्या धावपळीच्या जीवनात रोज शरीर मसाज करणे हे अशक्य कोटीतले बनले आहे. यावर उत्तम उपाय आहे तो पायाच्या तळव्यांना करायचा मसाज.

हा मसाज अगदी सोपा, कमी वेळात होणारा तर आहेच पण तो स्वतःचा स्वतः करता येतो. व संपूर्ण अंगमर्दनाचे फायदेही त्यातून मिळतात. दिवसभरात कोणत्याही वेळी व कुठेही तो करता येतो. या मसाजचाही शरीरातील सर्व अवयवांना फायदा मिळतो. या मसाजमळे आरोग्य सुधारते, रक्तप्रवाह सुरळीत होतो, संतुलित होतो तसेच स्फूर्तीही मिळते. यामागे असे कारण सांगितले जाते की पायाच्या तळव्यात शरीरातील सर्व अवयवांशी नेटवर्कने जोडलेल्या तब्बल १५ हजार नसा आहेत. तळव्याला मसाज केल्यामुळे या नसा कार्यरत होतात आणि शरीरातील संबंधित सर्व अवयवांचा रक्तपुरवठा वाढल्याने ते अवयवही सुदृढ राहण्यास मदत मिळते.

या मसाजचा विधी सोपा आहे. कोणतेही क्रिम अथवा तेल घेऊन प्रथम एका पायाच्या तळव्याला खालून संपूर्णपणे चोळावे. पायाच्या बोटांपासून टाचेपर्यंत असा हा मसाज करावा. नंतर पायाच्या बोटांना थोडासा पीळ देऊन हलक्या हाताने ती ओढावीत. दोन्ही हातात पायाचा तळवा धरून पायाच्या मध्यावर बोटांपासून टाचेपर्यंत दाबत यावे व टाचेच्या मागच्या पायाच्या भागावरही दाब द्यावा. नंतर पुन्हा तळव्याच्या दोन्ही बाजूंनी असाच बोटांचा दाब देत बोटांपासून टाचेपर्यंत यावे. नंतर दुसर्‍या पायालाही असाच मसाज द्यावा. पायाच्या वरच्या बाजूवरही बोटांनी असाच दाब द्यावा. पाच मिनिटांत एका पावलाचा मसाज होतो.

Leave a Comment