‘टीव्हीएस’ही आता ‘स्नॅपडील’वर

tvs
चेन्नई: ‘टीव्हीएस’ ने आता ऑनलाईन बाजारपेठेत प्रवेश केला आहे. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने ‘टीव्हीएस’ या दुचाकी वाहने बनविणाऱ्या कंपनीने ‘स्नॅपडील’ या आघाडीच्या ऑनलाईन विक्री कंपनीशी करार केला आहे.

एकूण ९ प्रकारच्या दुचाकीची निर्मिती करणाऱ्या ‘टीव्हीएस’ कंपनीच्या वाहनाच्या मॉडेल्सची, रंगाची आणि डीलर्सची निवड ‘स्नॅपडील’वरून करता येणार आहे.

‘स्नॅपडील’सारख्या उच्च तंत्रज्ञानाचा अंगीकार करणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर ग्राहकांपर्यंत पोहोचलेल्या कंपनीशी भागीदारी करण्याने ‘टीव्हीएस’ची व्याप्ती निश्चितपणे वाढणार आहे; असा विश्वास ‘टीव्हीएस मोटर्स’च्या विक्री विभागाचे उपाध्यक्ष जे एस श्रीनिवासन यांनी सांगितले.

दुचाकीच्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘टीव्हीएस’च्या समावेशाने ‘स्नॅपडील’च्या ‘मोटर्स प्लॅटफॉर्म’मध्ये मोलाची भर पडल्याचे ‘स्नॅपडील’चे उपाध्यक्ष टोनी नवीन यांनी स्पष्ट केले. भारतात ‘मोटर्स प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून देणारी ‘स्नॅपडील’ ही पहिली कंपनी असल्याचा दावाही त्यांनी केला.

Leave a Comment