इनफोकसने लाँच केला ३ जीबी रॅमचा स्मार्टफोन

infocus
नवी दिल्ली : बिंगो सीरिजमधील नवा स्मार्टफोन स्मार्टफोन उत्पादक कंपनी इनफोकसने लाँच केला असून याची किंमत केवळ साडेसात हजार रुपये इतकी आहे.

याची ईकॉमर्स वेबसाईट स्नॅपडीलवर रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. २१ मार्चला या स्मार्टफोनचा पहिला सेल होणार आहे. या स्मार्टफोनचे नाव बिंगो ५० असे आहे. यात पाच इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. १.३ गिगाहर्टझ मीडियाटेक क्वाडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यात तीन जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. यात ८ मेगापिक्सेल रिअर आणि फ्रंट कॅमेरा आहे तर अँड्रॉईड ६.० मार्शमेलो आहे.

Leave a Comment