आणखी ५०० औषधांवर बंदी घालण्याची तयारी

medicine
नवी दिल्ली : खोकल्यासाठी आवश्यक असलेल्या सिरपच्या मिश्रणासह किमान ३४४ औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातल्यानंतर आता आणखी ५०० औषधांवर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे. ज्या औषधांमध्ये दोन किंवा अधिक मात्रांचे मिश्रण आहे, अशी औषधी बंद करण्यात येणार आहे. कारण अशा मात्रा मानवी शरीराला घातक ठरू शकतात किंवा शरीराला ते जोखमीचे आहे. त्यापेक्षा आणखी सुरक्षित पर्यायही आहेत, असे सांगण्यात आले.

बरीच अँटिबायोटिक आणि अँटी डायबिटीस औषधी असुरक्षित आणि निष्प्रभावीही आहे. त्यामुळे अशी औषधी बेकायदेशीर ठरू शकते. भारतात अमेरिकन फार्मास्युटिकलच्या अ‍ॅबॉट लॅबरेटरीज या मोठ्या कंपनीद्वारे अँटीबायोटिक कॉम्बिनेशची विक्री करण्यात येत असलेल्या ३४४ औषधांवर आरोग्य प्राधिकरणने बंदी घातली. अ‍ॅबॉटच्या भारतीय युनिटमध्ये तयार होत असलेल्या अँटिबायोटिक्स कॉम्बिनेशनच्या सेफिक्साईम आणि अ‍ॅन्थ्रॉमायसिन या औषधांच्या विक्रीसाठी अद्याप केंद्राकडून परवानगी घेतलेली नाही. अर्थात, परवानगी न घेताच या औषधाच्या विक्रीची तयारी सुरू आहे. या कॉम्बिनेशनचे मोठे फामॉस्युटिकल मार्केट अमेरिका, यूके, जर्मनी, फ्रान्स आणि जपानमध्ये आहे. परंतु तेथेच या औषधाची विक्री करण्याला पवानगी नाही.

केंद्रीय ज्या औषधांमद्ये १ हजारपेक्षा जास्त एफडीसी आहे, अशा तब्बल ६ हजार औषधांचे वरिष्ठ अधिकारी मूल्यांकन करीत आहेत. त्यामुळे येत्या ६ महिन्यांत किमान ५०० औषधांवर बंदी घातली जा शकते, असे सांगण्यात आले. तब्बल १ हजारपेक्षा अधिक प्रकरणात ही औषधी अप्रासंगिक असल्याचे प्राथमिक पुरावे मिळाले आहेत. परंतु त्याचा अभ्यास पूर्ण झालेला नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment