अॅमेझॉनमध्ये विलीन होण्याच्या तयारीत फ्लिपकार्ट !

flipkart
मुंबई – अॅमेझॉनमध्ये विलीन होण्यासाठी देशाची सर्वात मोठी ऑनलाईन उत्पादने विक्री करणारी कंपनी फ्लिपकार्टने प्रयत्न चालवले होते. या खुलाशामुळे फ्लिपकार्टच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मात्र अशा प्रकारचा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचे फ्लिपकार्टने आरोप फेटाळून लावले म्हटले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन यांच्यामध्ये चर्चा करण्यात आली होती. मात्र ही चर्चा कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचली नाही. सप्टेंबर-डिसेंबर २०१५च्या तिमाहीपर्यंत ही चर्चा सुरू होती. मात्र चर्चेबाबतची सुरुवात फ्लिपकार्ट की अॅमेझॉनकडून करण्यात आली, याची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

आम्ही विकणारे नसून, आम्ही सतत रक्कम जमा करत जाणार आहोत. फ्लिपकार्ट योग्य पद्धतीने निधी जमा करणार आहे. कंपनी विकण्याच्या बातमीला कोणताही आधार नसल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांनी म्हटले आहे. बिन्नी बन्सल जानेवारीमध्ये फ्लिपकार्टचे सीईओ झाले आहेत. त्यांनी सहव्यवस्थापक सचिन बन्सल यांची जागा घेतली आहे. फ्लिपकार्ट भारतामध्ये प्रमुख ऑनलाईन विक्रेती कंपनी असून, आम्ही या क्षेत्रामध्ये दीर्घ कालावधीचा व्यवसाय करण्यासाठी उतरलो आहाते, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment