८ महिन्यात १ लाखापेक्षा जास्त ह्युंडाईच्या क्रेटाची बुकिंग

hyundai
मुंबई – ह्युंडाई क्रेटाला लॉंचनंतर बाजारामध्ये चांगली प्रतिक्रिया मिळत असून कंपनीने ८ महिन्यामध्ये ह्युंडाई क्रेटाची १ लाखापेक्षा जास्त बुकिंग झाल्याचा दावा केला आहे. ज्यापैकी ५६,००० यूनिटची डिलिवरीसुध्दा झाली आहे.

कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ वाय.के यांनी सांगितले की, आम्ही आमच्या ग्राहकांचे आभारी आहोत. ज्यांनी ह्युंडाई क्रेटाला इतके पसंद केले आहे. हा आमचा आमच्यातील एक रेकॉर्ड आहे. ह्युंडाई क्रेटाला कोलंबिया, कोस्टा रिका, पेरू, ओमान, यूएई, सऊदी, इजिप्त, मोरोक्को आणि नायजेरियामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु वाढती मागणी लक्षात घेता गाडयांचा वेटिंग टाइमसुध्दा वाढत आहे. कंपनीने हा निर्णय घेतला आहे की, ह्युंडाई क्रेटाचा वेटिंग टाइम कमी करण्यासाठी आता दर महिन्याला १३,००० यूनिट तयार केले जाणार आहे. ज्यामध्ये १०,००० यूनिट बाजारासाठी तयार केले गेले आहे.

ह्युंडाई क्रेटा तीन इंजिन ऑप्शनसोबत बाजारामध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये १.६ गामा डुअल वीटीवीटी, १.६-लीटर यू२ सीआरडीआय वीजीटी आणि १.४ लीटर सीआरडीआय इंजिन समाविष्ट आहे.याशिवाय या गाडीचे ऑटोमेटिक मॉडेल उपलब्ध आहे. ह्युंडाईची प्रतिस्पर्धी असलेल्या मारुती सुजुकी बलेनोलासुध्दा १ लाख बुकिंग मिळाली आहे. मारुती सुजुकी बलेनोची वेटिंग टाइम ६ महिन्यापर्यंत आहे.