लिलावात आली जगातील सर्वात छोटी बंदूक

gun
बंदूकींचे आपण जर का शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, लिलावात जगातील सर्वात छोटी बंदूक विक्रीसाठी काढण्यात आली असून नखांपेक्षाही छोटा असा या बंदूकीचा आकार असल्याचे सांगितले जात आहे. बंदूकीच्या जगात सर्वात छोटे असणे हेच या बंदूकीचे खास वैशिष्ट्य ठरले आहे. या बंदूकीचे नाव पेटिट प्रोटेक्टर असे आहे.

१९व्या शतकात ही बंदूक बनविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बंदूकीला दागीण्यांप्रमाणे अंगवार घालून मिरवताही येते. या बंदूकीच्या खास फिचर्सबद्धल बोलायचे तर, बंदूकीला ‘पेटिट’मध्ये एक स्टील रकॉईल प्लेस आहे. जी एक पिनफायर सिलेंडरम्हणून काम करते. ४ राऊंड फायर करण्याची क्षमता या बंदूकीत आहे. अत्यंत छोटी असल्याच्या कारणामुळे ही बंदूक केवळ हाताच्या सहाय्याने चालवता येऊ शकते.

युरोपियन ऑनलाईन ऑक्शन हाऊसच्या माध्यमातून या बंदूकीचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव ११ मार्चला सुरू झाला असून, तो १८ मार्च पर्यंत चालणार आहे. म्हणजेच अजूनही तीन दिवस शिल्लक आहेत तुम्हाला जर ही बंदूक हवी असल्यास तुम्ही ऑनलाईन बोली नक्कीच लावू शकता.