बाजारपेठेत दाखल झाली रॉयल एनफिल्डची ‘हिमालयन’

royal-enfield
नवी दिल्ली : आपली ‘हिमालयन’ ही नवी कोरी बाईक एका खास वर्गासाठी बाईक बनवणाऱ्या टू व्हिलर निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने कमर्शिअली लॉन्च केली असून ही बाईक आता बाजारात उपलब्ध झाली आहे.

सगळ्याच स्थानांवर चालणारी ही ४११ सीसी बाईक लॉन्च करून रॉयल एनफिल्डने स्पोर्टस सेगमेन्टमध्ये प्रवेश केला आहे. आयशर मोटर्सची टू व्हिलर्सच्या या कंपनीचे बुटेल, क्लासिक, थंडरबर्ड आणि कॉन्टिनेन्टल जीटी या बाईक्स ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. शहरी, ग्रामीण तसेच रफ रोडवरदेखील ही बाईक सहजरित्या चालवता येणार आहे. आयशर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ लाल यांच्या म्हणण्यानुसार, रोमांचक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी हा एक नवा प्रयोग आहे. या बाईकच्या माध्यमातून आपल्याला अनेक रोमांचक प्रवास अनुभव घेणारे मिळतील. आता, पाहायचे आहे की हा बदल ग्राहक तेजीने स्वीकारतात की तो हळू-हळू पुढे जाणार. हिमालयनमध्ये गिअरबॉक्स आणि २४.५ बीएचपीचे इंजिन आहे. महाराष्ट्रात या बाईकची शोरूम किंमत १.५५ लाख रुपये आहे. मुंबईत, ऑन रोड या बाईकची किंमत असेल १.७८ लाखांपर्यंत असणार आहे. ‘एअर पोल्युशन’शी निगडीत बीएस ४ स्टँडर्ड नसल्यामुळे ही बाईक दिल्ली शहरात विकली जाणार नाही. परंतु, गुरगाव, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा या परिसरात मात्र ही बाईक १.७९ लाख रुपयांना उपलब्ध होईल.

Leave a Comment