आता पुरुषांसाठी देखील गर्भनिरोधक गोळी

birth-control
वॉशिंग्टन – आज बाजारात महिलांसाठी गर्भधारणा रोखण्यासाठी अनेक गर्भरोधक साधने उपलब्ध आहेत. त्यातुलनेत पुरुषांसाठी फार कमी पर्याय आहेत. लवकरच महिलांप्रमाणे पुरुषांसाठीही संशोधकांच्या प्रयत्नांमुळे बाजारात गर्भनिरोधक गोळया उपलब्ध होऊ शकतात.

पुरुषांसाठीही टेस्टोस्टोरेनच्या वापराने गर्भनिरोधक गोळ्या बनवता येऊ शकतात, परंतु त्याच्या अतिसेवनाने वंध्यत्व येण्याचा धोका असल्याचे जिलियन कायझर या शास्त्रज्ञाने सांगितले. पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी बाजारात आणताना अनेक चाचण्यांव्दारे ती गोळी सुरक्षित असल्याचे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. पुरुषांसाठी जी गर्भनिरोधक गोळी बाजारात येणार आहे, त्यामुळे प्रजनन क्षमता आणि लैंगिक क्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही हे सुनिश्चित करण्यावर संशोधन सुरु आहे.