युरोप, रशियाची जीवसृष्टी शोधण्यासाठी मानवरहित अंतराळ मोहीम

exomars
पॅरिस – मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी युरोप आणि रशिया मिळून मानवरहित अंतराळ यान प्रक्षेपित करणार असून मंगळ ग्रहाच्या वातावरणात वायूंच्या अस्तित्वाविषयी पुरावे शोधण्याचा प्रयत्न हे यान करेल आणि तेथे कधी जीवसृष्टी होती का किंवा आता आहे का याचा शोध घेणार आहे.

दोन टप्प्यातील मंगळ शोध मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात एक्सोमार्स २०१६ मध्ये रशियाच्या प्रोटोन अग्निबाणाने सोमवारी आंतरराष्ट्रीय वेळेनुसार ९ वाजून ३१ मिनिटांनी ऑर्बिटरला कजाकिस्तान प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित केले जाईल. अत्यंत उच्च तंत्रज्ञान उपकरणांनी युक्त ट्रस गॅस ऑर्बिटर किंवा टीजीओ ३०८ दशलक्ष मैलाचे अंतर पार करून १९ ऑक्टोबर रोजी लालग्रहावर पोहोचेल. याचे मुख्य उद्देश मंगळाची छायाचित्रे घेणे आणि याच्या हवेचे विश्लेषण करणे आहे. टीजीओ आपल्यासोबत एक मार्स लँडर श्चियापारेली याला देखील घेऊन जाणार आहे.

एक्सोमार्स २०१६ मिशन प्रक्षेपण स्थळावर तयार असल्याचे युरोपीय अंतराळ संस्थे (ईएसए) ने ट्विटद्वारे सांगितले. एक्सोमार्स ईएसए आणि रशियाची रोसकोसमोस अंतराळ संस्थेदरम्यानचे एक दोन स्तरीय सहकार्य आहे. याच्या दुस-या टप्प्यात २०१८ मध्ये मार्स रोव्हर प्रक्षेपित केले जाणार आहे, परंतु निधीच्या कमतरतेमुळे यात विलंब होऊ शकतो. पहिल्या टप्पा योजनेरुप तसेच मोठय़ा अपेक्षांसह पुढे जात असल्याचे ईएसएने सांगितले.

Leave a Comment