प्लॅस्टीक नष्ट करणार्‍या बॅक्टेरियाचा शोध

plastic
जपानच्या क्योटो विद्यापीठातील संशोधकांनी प्लॅस्टीकचे विघटन करून ते नष्ट करणार्‍या बॅक्टेरियाचा शोध लावला आहे. हे संशोधन प्लॅस्टीक कचर्‍यामुळे होणार्‍या प्रचंड प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी जगाला मिळालेले वरदान ठरू शकेल असे समजले जात आहे.

नैसर्गिकपणे प्लॅस्टीक नष्ट होत नाही. मात्र या बॅक्टेरियातील दोन एन्झाईम्स प्लॅस्टीकचे अणू नष्ट करतात. प्लॅस्टीकमधील मुख्य घटक पीईटी हा जाळूनही नष्ट करता येत नाही. जपानी संशोधकांनी शोधलेले बॅक्टेरिया पीईटीचा पातळ थर ३० डिग्री तापमानाला पूर्णपणे नष्ट करू शकतात. या पीईटीचा वापर पॉलिथीन, टेरेफ थेलेट व बाटल्या बनविण्यासाठी केला जातो. आजकाल बाटल्यापासून ते कपड्यांपर्यंत सर्व वस्तूत प्लॅस्टीकचा वापर केला जात आहे त्यामुळे प्रदूषणाचा विळखा जगाला पडला आहे. जगात टनावारी प्लॅस्टीक कचरा साठतो आहे त्यापासून मुक्त होण्यास हे बॅक्टेरिया उपयुक्त ठरणार आहेत.

जगात २०१३ या एकाच वर्षात ५६० लाख टन पीईटीचे उत्पादन झाले असल्याचे आकडेवारी सांगते. या मुळे संपूर्ण जगालाच धोका निर्माण होत आहे.

Leave a Comment