प्राणी हत्या न करताही होणार मांसाचा पुरवठा

valeti
कोणत्याही प्राण्याची हत्या न करताही स्वच्छ, सुरक्षित व पौष्टीक मांस मिळण्याची सोय भारतीय अमेरिकन वैज्ञानिक व त्यांच्या दोन साथीदारांनी केलेल्या संशोधनामुळे होऊ शकणार आहे. या मांसाला फयूचर मीट असे म्हटले गेले आहे. हृदयरोग तज्ञ व मेम्फिस मीटसचे सीई्र्रओ उमा एस वलेती यांनी प्रयोगशाळेत हे मांस तयार केले आहे. वलेती हे मूळचे आंध्रप्रदेशातील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी जनावराच्या शरीरातील कही ठराविक पेशींपासून हे मांस विकसित केले आहे. हे मांस खराब होणार नाहीच पण त्यावर बॅक्टेरियांची वाढ ही होणार नाही. त्यामुळे ते स्वच्छ, सुरक्षित व पौष्टीक आहेच पण त्यासाठी प्राण्यांना ठार करण्याचीही आवश्यकता नाही. येत्या कांही वर्षात हा व्यवसाय भरभराटीला येईल अ्साही वलेती यांचा दावा आहे.

प्राण्यांच्या शरीरातील रिप्रोड्यूस होऊ शकणरया पेशींमध्येच योग्य प्रमाणात ऑक्सिजन, शुगर व अन्य पोषक पदार्थ घालून हे मांस तयार केले गेले आहे. प्रक्रिया केल्यानंतर हे मांस पूर्ण विकसित होण्यासाठी ९ ते २१ दिवसांचा कालावधी लागतो असेही समजते.

Leave a Comment