सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएल लवकरच झिरो बेस मोबाईल टॉवर्स उभारणार असल्याची माहिती अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. ते म्हणाले हे टॉवर्स आकर्षक दिसतीलच पण ते बहुपयोगी असतील. असे ५० टॉवर्स पहिल्या टप्यात उभारण्यात येणार असून त्यासाठीच्या निविदा नोकिया, एरिक्सन, ह्युवाई व जेटीई या कंपन्यांकडून मागविल्या गेल्या आहेत. या कंपन्यांनी हे टॉवर्स नुकत्याच पार पडलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस परिषदेत सादर केले होते.
बीएसएनएल ५० झिरो बेस मोबाईल टॉवर्स उभारणार
मिळालेल्या माहितीनुसार सध्या भारतात मोबाईल टॉवर्सची संख्या प्रचंड आहे मात्र बीएसएनएल कडून बसविले जाणारे झिरो बेस टॉवर्स हे फक्त मोबाईल सिग्नलसाठीच नाही तर अन्य कामांसाठीही उपयोगी पडणार आहेत. हे टॉवर्स वायफाय हॉटस्पॉट, रस्त्यावरचे दिवे तसेच कॅमेरा म्हणूनही वापरता येणार आहेत. या टॉवरच्या पोलमध्ये रेडिओही बसविता येणार आहे.