ही आहे नाशिकची ‘गुगल गर्ल’

google
नाशिक – आपल्याला सगळ्यांनाच लहान मुलांची स्मरण शक्ती किती असू शकते याचा अंदाज असतो. मात्र नाशिकच्या एका वय वर्ष साडेतीन असणाऱ्या मुलीची स्मरण शक्ती पाहून अचंबित व्हायला होते. ते केवळ तिच्या तोंडून येणाऱ्या २०५ देशांच्या राजधान्यांची नावे ऐकून. भन्नाट ज्ञान असणाऱ्या चिमुकलीचे नाव रिशा साबद्रा असे आहे. तिच्या या ज्ञानामुळे तिला शाळेत “गुगल गर्ल” म्हणूनही ओळखले जाते.

रिशाला एखादी गोष्ट सांगितली की, ती तिच्या चटकन लक्षात राहते. तिच्यातला हाच गुण हेरुन रिशाच्या आईने तिला गुगल गर्ल बनवले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रिशाला कुठल्याही देशाची राजधानी विचारा ती क्षणाचाही विलंब न करता अगदी चटकन सांगते. सोबतच तिला इतर अनेक ठिकाणांची देखील चोख माहिती आहे.

आज या चिमुकलीला २०५ देशांच्या राजधान्या तोंडपाठ असून ११ वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना अवघड वाटणारी गणितातील फॉर्मुले, हेल्फ एंजल फॉर्मुला, डबल एंजल फॉर्मुला अशा किती तरी गोष्टी तोंडपाठ आहेत. रिशाला वाचनासोबत संगीत, डान्स, स्टेज परफॉर्मन्सची देखील आवड आहे.