पुणेकरांना उपलब्ध झाली बॉनअव्हील क्लासिक सुपर बाईक

bike
पुणे : पुण्याच्या पाषाणमधील बी यू भंडारी ऑटोमोटीव्ह प्रायव्हेट लिमिटेडमध्ये स्टाईल, वेग, कम्फर्ट आणि १००० सीसीचे इंजिन अशा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी बॉनअव्हील क्लासिक ही बाईक पुणेकरांना उपलब्ध झाली असून कोणत्याही बाईक वेड्याचे ट्रायम्फ ही बाईक खरेदी करण्याचे स्वप्न असते. आता याच बॉनअव्हिल क्लासिकचे अत्याधुनिक रूप असलेली स्ट्रीट ट्विन पुण्यात उपलब्ध झाली आहे.

पाषाणमधील बी यु भंडारी शो रूम मध्ये विविध रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या स्ट्रीट ट्विन या बाईकचे लॉन्चींग नुकतेच पार पडले. अत्याधुनिक तंत्रज्ञान वेगाशी स्पर्धा करण्याची क्षमता, स्टाइलीश लूक, कम्फर्ट या सर्वच पातळ्यांवर उत्कृष्ट असणारी ही बाईक अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. अगदी ६७५ सी सी पासून २२०० सीसीपर्यंत ट्रायम्फची मॉडेल्स उपलब्ध आहेत.

Leave a Comment