हा पेंग्विन दरवर्षी करतो ८ हजार किमीचा प्रवास

penguin
पर्यटन म्हटले की आपल्यासमोर सामानाच्या भल्या मोठ्या बॅगा वागवत धावतपळत चाललेली, कांहीशी गोंधळलेली जनता येते. मात्र पक्षीही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटन करतात म्हणजेच स्थलांतर करून येतात. असाच दरवर्षी आठ हजार किमीचा प्रवास करणारा पेंग्विन सध्या चर्चेचा विषय ठरला असून हा पेंग्विन दरवर्षी इतका मोठा प्रवास केवळ त्याच्या उपकारकर्त्याच्या भेटीसाठी करतो. जंगली प्राणी आणि माणूस याच्यातील दोस्तीच्या अनेक कथा आपल्याला माहिती आहेत मात्र ग्लेशियर भागात राहणारा हा डिनडिम नावाचा पेंग्विन आणि ७१ वर्षांचा जोआओ यांच्यातील हे ऋणानुबंध खासच म्हणावे लागतील.

मिळालेल्या माहितीनुसार ब्राझीलच्या रिओजवळ राहणारा जोआओ मिस्त्री काम करतो तसेच बरेचवेळा मासेमारी करूनही पैसे मिळवतो.२०११ साली तो असाच मासेमारी करत असताना त्याला तेलाने माखलेला आणि भुकेने व्याकुळ झालेला लहान पेंग्विन दिसला. भूतदयेपोटी जोआओने त्याला घरी नेले, त्याचे पंख स्वच्छ केले, त्याला खाऊ पिऊ घातले आणि ताकद येईपर्यंत पोटच्या मुलासारखे सांभाळले. जोआओने या पेंग्विनला नाव दिले डिनडिम. डिमडिन पुन्हा त्याच्या मूळ स्थानी जाऊ शकतो असा विश्वास वाटल्यानंतर जोआओने त्याला समुद्रात सोडून दिले. मात्र कांहीच महिन्यात डिमडिन पुन्हा परतला व जोआओच्या घरी गेला. आता आठ महिने डिमडिनचा मुक्काम जोआओकडे असतो आणि ब्रिडींगच्या काळात तो अर्जेंटिनात जातो, पिले झाली की परत आपला कुटुंबकबिला सोडतो आणि जोआओकडे हजर होतो. त्यासाठी त्याला ८ हजार किमीचा प्रवास करावा लागतो. जोआजोला तर डिनडिम त्याचा मुलगा वाटतो डिमडिनचीही भावना अशीच असावी असाही जोआओला विश्वास आहे.

Leave a Comment