फेसबुकवर सर्वात मोठी स्मशानभूमी?

facebook
नवी दिल्ली – जर तुम्हाला ओळखीच्या पण मृत व्यक्तीकडून नोटीफिकेशन्स येत असतील, तर भारावून जाऊ नका. फेसबुकवर मृत युझर्सच्या प्रोफाईल्स अस्तित्वात असणा-या युझर्सपेक्षा जास्त आहेत म्हणून संशोधकांच्या म्हणण्यानुसार सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक हे लवकरच ह्या दशकातील जगातले सर्वात मोठे वास्तविक स्मशानभूमी होणार आहे.

लवकरच लिगसी पॉलिसीद्वारे फेसबुकने मृत व्यक्तीच्या प्रोफाईलचा अभ्यास करून त्यांच्या शेवटच्या पोस्टवरून आणि पाठवल्या जाणा-या रिक्वेस्टवरून अकाऊंटबद्दल माहिती मिळवणार आहे. डिजीटल ब्लॉगिंग कंपनीच्या म्हणण्यानुसार, किमान ९,७०,००० फेसबुकचे युझर्स दरवर्षी मृत पावतात.

२०१० मध्ये ३,८५,९६८ तर २०१२ मध्ये ५,८०,००० युजर्स मृत पावले. सिद्दीकींनी लवकरच ‘फेसबुक’ विमापॉलिसी राबवणार आहे अशी माहिता दिली. फेसबुकच्या युझर्सने मृत व्यक्तींच्या बर्थडे अलर्टच्या तक्रारी केल्या होत्या. सोशल मीडियाची सर्वात महत्वाचे माध्यम फेसबुकचे जगभरात सध्या १.५ बिलीयन युझर्स आहेत. त्यामुळेच मृत युझर्समुळे २०९८ पर्यंत जगातले सगळ्यात मोठे वास्तविक स्मशानभूमी होणार आहे,असे डेलीमेल युनायटेड किंगडमचे संख्याशात्रज्ञ हाशिम सिद्दीकी यांनी अहवालात म्हटले आहे. मृत व्यक्तींचे फेसबुक अकाऊंट कायमचे बंद करण्यापेक्षा त्यांचे स्मरणोत्सव साजरा करण्याचे फेसबुकने ठरवले आहे. तसेच फेसबुकने मृत युझर्सचे अकाऊंट डिलीट करण्यास नकार देत, फेसबुकच्या अस्तित्वात असणा-या युझर्सची संख्या वाढेल असे आश्वासनही दिले आहे.

Leave a Comment