गरीब महिलांसाठी मोफत एलपीजी योजना

lpg
दिल्ली- दारिद्र रेषेखालील महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकार मंत्रीमंडळाने गुरूवारी मंजूर केली.पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तीन वर्षांसाठीची ही प्रधानमंत्री उज्ज्वल योजना मंजूर करण्यात आली असून त्यासाठी ८ हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. तेल व इंधन मंत्री धर्मेश प्रधान यांनी ही माहिती दिली.

भारतात आजही स्वयंपाकासाठी चुली वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि यात बहुसंख्य दारिद्र रेषेखालील लोक आहेत. महिला सबलीकरण आणि महिलांच्या आरोग्याची काळजी म्हणून या स्तरातील महिलांना मोफत कनेक्शन दिली जाणार असून पहिल्या वर्षात त्यासाठी अर्थसंकल्पात २ हजार कोटींची तरतूद केली गेली आहे. पहिल्या वर्षात १ कोटी ५० लाख क नेक्शन दिली जातील तर तीन वर्षाच्या कालावधीत हीच संख्या ५ कोटींवर जाणार आहे.

तज्ञांच्या मते घरात पेटती चूल असणे हे दिवसाला ४०० सिगरेट ओढण्याइतकेच हानीकारक आहे. त्याचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत असल्याने युद्धपातळीवर त्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक होते. गॅस कनेक्शनमुळे याकामी मोठी मदत होईलच पण प्रदूषण पातळीही कमी होणार आहे.

Leave a Comment